उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहरात पायी चालणेही जीवावर बेततय, अपघाती मृतांमध्ये ‘इतके’ टक्के पादचारी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात जानेवारी 2017 ते 14 मे 2022 या कालावधीत 952 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यापैकी 259 पादचार्‍यांचा समावेश आहे. एकूण अपघाती मृतांपैकी 27 टक्के मृत्यू पादचार्‍यांचे असल्याने शहरात पायी चालणेही जीवावर बेतत असल्याचे वास्तव समोर येत आहे. चालू वर्षात 23 पादचार्‍यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यात तीन अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. तर वृद्ध पादचार्‍यांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे.

तिगरानिया रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यावसायिकाचा कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. तर कॉलेजरोड येथे रस्ता ओलांडणार्‍या वृद्धेस वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. या घटनांनी रस्त्यावरून पायी चालण्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. वाढते अतिक्रमण, फुटपाथवर वाहनांचे अनधिकृत वाहनतळ झाल्याने पादचार्‍यांना पायी चालण्यासाठी रस्त्यावर यावे लागत आहे. त्याचप्रमाणे बेशिस्त वाहनचालकही वाहतूक नियम पाळत नसल्याने त्यांच्याकडून भरधाव वाहने चालवली जात असल्याने पादचार्‍यांना धडक बसून त्यात पादचार्‍यांचा मृत्यू होत आहे, तर अनेक जण जखमी होत आहे.

चालू वर्षात शहरात 67 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यात 52 पुरुष व 15 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 14 पुरुष व नऊ महिला पादचार्‍यांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. पादचारी मृतांमध्ये सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. सकाळी किंवा सायंकाळच्या सुमारास पायी फिरत असताना वाहनांनी धडक दिल्याने पादचार्‍यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पादचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी फुटपाथ मोकळे करण्यासोबतच रस्ता ओलांडणार्‍यांसाठी झेब्रा क्रॉसिंग उभारणे, अतिक्रमण काढणे गरजेचे झाले आहे.

वर्ष       पादचारी            एकूण
मृत्यू               मृत्यू
2017      50                 171
2018      59                  217
2019      42                   177
2020      45                   171
2021      40                   149
14 मे     23                    67
2022 पर्यंत

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT