सांगलीत लग्न समारंभातून 68 हजारांचा ऐवज लंपास | पुढारी

सांगलीत लग्न समारंभातून 68 हजारांचा ऐवज लंपास

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जुनी धामणी (ता. मिरज) येथील स्वाती संतोष गायकवाड यांचे लग्न समारंभातून सोन्याचे दागिने व 25 हजारांची रोकड लंपास केली. कर्नाळ रस्त्यावरील भोसले गार्डन मंगल कार्यालयाच्या वरपक्षाच्या खोलीत ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती गायकवाड यांच्या नणंदेच्या मुलाचे भोसले गार्डन मंगल कार्यालयात शनिवारी लग्न होते. दुपारी साडेबारा वाजता लग्न झाल्यानंतर त्यांनी दागिने व 25 हजारांची रोकड पर्समध्ये ठेवली. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स उघडून त्यामधील दागिने व रोकड लंपास केली.

गायकवाड पावणेएक वाजता जेवण करुन आल्या. त्यावेळी पर्स त्यांना उघडी दिसली. त्यामध्ये दागिने व रोकड नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. अवघ्या पंधरा मिनिटात चोरी झाली होती. नातेवाईकांकडे त्यांनी चौकशी केली. पण कुणाला काहीच माहिती नव्हती. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा त्यांनी फिर्याद दाखल केली.

Back to top button