उत्तर महाराष्ट्र

नाशिक : आठ हजार अनधिकृत फेरीवाल्यांना वर्षभरात अटक, आरपीएफची कामगिरी

गणेश सोनवणे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोडचा समावेश असलेल्या भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 2022-23 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया व विभागीय सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ही कामगिरी केली.

रेल्वे प्रवासात गाडीची चेन खेचण्याची 847 प्रकरणे या वर्षात समोर आली. गेल्या वर्षीच्या 1615 प्रकरणांच्या तुलनेत 47.55 टक्के घट झाली. कायदा व सुव्यवस्थेची यंदा फक्त 8 प्रकरणे झाली. गेल्या वर्षी 10 होती. 'मेरी सहेली' मोहिमेंतर्गत महिला सुरक्षेच्या 83 प्रकरणांत 83 लोकांना अटक करण्यात आली.

दिव्यांग जन, आजारी, जखमी प्रवाशांना १७ प्रकरणांत मदत करण्यात आली. दारू, तंबाखू आदींविरुद्ध 3 प्रकरणांत तिघांना अटक झाली. अंमली पदार्थ तस्करी विरुद्ध कारवाईत पाच प्रकरणांमध्ये 8.38 लाख किमतीचा माल जप्त करून पाच लोकांना अटक करण्यात आली. चालू गाडीत गरोदर महिलांची बाळंतपणाची प्रकरणे झाली. दगडफेक, ज्वलनशील पदार्थ, धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध सहा प्रकरणांमध्ये आठ लोकांना अटक केली. गेल्या वर्षी सहा जणांना अटक झाली होती. जमीन अतिक्रमण हटावच्या सात मोहिमा झाल्या. गेल्या वर्षी तीन मोहिमा झाल्या. अनधिकृत विक्रेते, फेरीवाल्यांवर कारवाईची 8703 प्रकरणे होऊन 8703 जणांना अटक झाली.

खून, अपहरण, बलात्कार, दरोडा यासारख्या गुन्हेगारीच्या 11 प्रकरणांमध्ये 11 जणांना अटक झाली. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'मध्ये 273 बेपत्ता मुले (153 मुले आणि 120 मुली) सापडली. त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. गेल्या वर्षी 203 हरवलेली मुले सापडली होती. गाडीत राहिलेले सामान २६७ प्रवाशांना परत केले. गेल्या वर्षी १४ रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले होते. यंदा 21 जणांचे प्राण वाचवले. पीआरएस आरक्षित तिकिटांच्या काळ्या बाजार प्रकरणी 49 प्रकरणांमध्ये 57 दलालांना अटक झाली. 'नो पार्किंग'च्या दहा प्रकरणांत 10 जणांना दंड केला. 'रेल रोको'च्या 5 प्रकरणांत 19 जणांना अटक केली. सिग्नल छेडछाड प्रकरणी 52 प्रकरणांत 53 जणांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT