डॉ. सिताराम कोल्हे  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित

गणेश सोनवणे

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

१५ ऑगस्ट २०२० रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल डॉ. सिताराम कोल्हे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. सन २०२० व २०२१ मध्ये कोरोना साथीमुळे पदक अंलकरण समारोह आयोजित करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे (दि. १३) रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते पोलीस पदक जाहीर करण्यात आलेल्या सर्व पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांची पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ.सिताराम कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ सिताराम कोल्हे यांची सन १९९१ साली राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती. सन १९९२-९३ मध्ये नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी मधून एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर त्यांनी लोहमार्ग नागपूर, नाशिक ग्रामीण विशेष सुरक्षा पथक, जळगाव, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक आणि सध्या नाशिक शहर येथे कार्यरत आहेत.

त्यांनी आजपर्यंत ३० वर्षाचे सेवा कालावधी मध्ये अतिशय क्लिष्ट, किचकट असे खून, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणून त्यामधील गुन्हेगारांना अटक करुन कौशल्यपुर्ण तपास केल्याने गुन्हेगारांना न्यायालयातून शिक्षा लागली आहे. त्यांना त्यांच्या सेवा कालावधीमध्ये आतापर्यंत ७०० हुन अधिक बक्षीसे व १२५ हुन अधिक प्रंशसापत्रे मिळाली आहे.  १ मे २०१६ रोजी त्यांना गुणवत्तापुर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. राजभवन येथे झालेल्या अतिशय दिमाखदार सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT