उत्तर महाराष्ट्र

समृद्धीत योगदानाबद्दल डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उभारणीत उत्कृष्ट कार्याबद्दल एमएसआरडीसीचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक तथा महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. ११) समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांच्या हस्ते डॉ. पुलकुंडवार यांना प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. पुलकुंडवार 5 मे 2018 ते 22 जुलै 2022 याकाळात एमएसआरडीसीचे संचालक होते. त्यापूर्वी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी असताना डॉ. पुलकुंडवार यांनी समृद्धीसाठी एक हजार हेक्टर जमिनीची खरेदी केली होती. त्यानंतर ते एमएसआरडीसीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली. दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 24 जिल्ह्यांच्या विकासात या महामार्गामुळे मदत होणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT