धुळे

धुळे : शिरुड-बोरी परिसरासाठी गिरणा पांझण डावा कालव्यात पाणी सोडावे – कुणाल पाटील

backup backup

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती असून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी नाही. अनेक गावांमध्ये ग्रामस्थ व जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने पाणी टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे गिरणा प्रकल्पातून पांझण डावा कालव्यात आवर्तने सोडण्यात यावेत, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील तसेच अधिक्षक अभियंता गिरणा प्रकल्प जळगाव यांच्याकडे केली आहे.

गिरणा पांझण डावा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आ.कुणाल पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.  धुळे तालुक्यात खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने नद्या-नाले कोरडे ठाक आहेत. तसेच सिमेंट बंधारे, के.टी.वेअर, लहानमोठे पाझर तलाव यातही पाणीसाठा नाही. परिणामी खरीप हंगामातील उत्पादन येणार नाही. यावर्षी खरीप हंगामात गिरणा धरणातून एकही आवर्तन देण्यात आले नव्हते. गिरणा धरणातून काढण्यात आलेल्या पांझण डाव्या कालव्यातून धुळे तालुक्यातील एकूण 12,141 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.

या कालव्यातून मोरदड, खोरदड, मोरदडतांडा, धामणगाव, चांदे, शिरुड, नाणे, सिताणे, तरवाडे, विंचूर इत्यादी गावातील शेती सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी दिले जाते. काही गावातील पाणी पुरवठा योजना व जनावरांना पिण्यासाठी पांझण डावा कालव्याचा मोठा आधार मिळतो. मात्र यावर्षी धुळे तालुक्यात दुष्काळ असल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. गिरणा प्रकल्पातून धुळे तालुक्यातील गिरणा पांझण डावा कालव्यात आवर्तने सोडण्यात यावे, अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली आहे.

हेही वाचंलत का?
SCROLL FOR NEXT