धुळे

आदिवासींच्या श्री डोंगऱ्यादेव महोत्सवास प्रारंभ; निसर्गपूजेलाही महत्त्व

गणेश सोनवणे

पिंपळनेर : (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यात आदिवासी समाजाचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेले श्री डोंगऱ्यादेव महोत्सवाला सुरवात झाली असून, पारंपरिक वाद्यांचा गजर आता आदिवासी गावात घुमू लागला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील अशा कुलदैवतांची अखंड परंपरा टिकावी यासाठी डोंगऱ्यादेव कार्यक्रम उत्साहात होत असून, आदिवासी भागात वर्षातून तीन कार्तिकीस विशेष स्थान दिले जाते. पौर्णिमेस खोपडी एकादशीला आदिवासींचे प्रमुख कुलदैवत डोंगऱ्यादेव महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरवात झाली. 26 डिसेंबरपर्यंत कार्यक्रमांचा कालावधी असतो.

आदिवासी दुर्गम भाग धडगावपासून पालघर आणि नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून डोंगऱ्यादेवास महत्त्वाचे स्थान दिले जाते. प्रामुख्याने धोमपूजनाने सुरू होतो. त्यात तुळस, झेंडूफूल, दगडी दिवा, सुपारी, नारळ, सब्वा रुपया, नागेलपान व कणसरा अशा निसर्गातील उपलब्ध वस्तूंची मांडणी थोमपूजा करून शेवऱ्या, भोपा, पावरकर, कतकरी, टापरा, मावल्या व घरधणी मावली अशा प्रमुख व्यक्तींच्या निवडीनंतर त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व मावल्या गावकरी दैवतांचे नियमांचे पालन करतात. एकमेकांना प्रणाम करताना विशेष शितमावली असा शब्दप्रयोग करून देवखळीत सन्मानपूर्वक आदर केला जातो. डोंगऱ्यादेव कुलदैवतांचा कार्यक्रम हा आठ दिवसांपर्यंत निसर्गदेवतांचे नियम पाळून रोज सायंकाळी घरभणी मावशीच्या घरी अंगणात थोमखळीवर एका तालासुरात गोल पध्दतीने तालासुरात संस्कृती परंपरेनुसार नाचतात कळीच्या चारही बाजूस धुनी पेटवली जाते. कतकरी थाळीनादात गोष्ट, कथा सांगतात. थोमखळीवर सायंकाळी सर्व मावल्यांचे नृत्य संपल्यानंतर विविध प्रकारचे नाटकरूपी, सोंगेरूपी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होते. त्यात प्रामुख्याने मासा मारणे, बोरे वेचणे, शिकार करणे व देवांगणी म्हणजे सातीशेवरी होय, याचे पूजन केले जाते. प्रमुख उद्देश म्हणजे धरतीमाता काळी आई (जमीन) होय. देवांगणी मातेचे दर्शन शेवटच्या रात्रजागरणाच्या वेळी पहाटे होते. 18 डिसेंबरला सकाळी डोंगऱ्यादेवाला केलेला मानत नैसर्गिक वातावरणातील डोंगऱ्यादेव गडावर पोचतात. डोंगरकपाऱ्यातील कणसऱ्यागड, पायऱ्यागड, भिवसनगड, कोलांड्यागड अशा विविध स्थळी वसलेल्या कुलदैवत डोंगऱ्यादेवाची पलंग मांडणी करून पूजा केली जाते. डोंगरावर व रानावनात दिवे लावले जातात. निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात आनंदाने कुलदैवतांचे मानपूर्व वंदन, नमन करून सर्व मावल्या आपल्या घरी परत येतात. घरी स्थापनास्थळी बोकड, कोंबडा मानता देऊन सर्व गाव मिळून भोजन (भंडारा) केला जातो. त्यानंतर घरभरणी व कणसरा पूजन करून डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम समाप्त होतो.

निसर्गपूजालाही महत्व

डोंगऱ्यादेव महोत्सवात निसर्गपूजेलाही महत्त्व दिले जाते. या महोत्सवातून आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपली जाते. डोंगऱ्यादेव वडिलोपार्जित गडचरणी, गावगुंडवादेव, मैदाणे, धवळीविहीर, झंझाळे गावगुंड्यादेव आता गावोगावी जाऊन परंपरा जोपासत आहे. डोंग-यादेव भाविक माउल्यांसोबत महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियान धुळे जिल्हा, साक्री तालुका कार्यकारिणी मंडळी आदींची नृत्यात सहभागी होऊन डोंगऱ्यादेव, निसर्गदेवाचे महत्व पटवून देताना, केवळ देवपूजा नाही, तर निसर्गपूजा आहे. ही निसर्ग संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती सुरू आहे.

गुजरात माडगावाहून टिपरीनृत्य करणारे गोकुळ देशमुख, गुलाब महाला, समाज संघटनेमार्फत मोठ्या प्रमाणावर कुलदैवत, निसर्गदेवांची जनजागृती केली जाते.

कार्यक्रम:

  • बुधवार, दि.20 डिसेंबर – थुंब पुजणाचा कार्यक्रम
  • रविवार, दि.24 डिसेंबर – रात्र जागरणाचा कार्यक्रम
  • सोमवार, दि.25 डिसेंबर – गाव मागण्याचा कार्यक्रम
  • मंगळवार, दि.26 डिसेंबर – गडावर जाणे व गडपूजा आणि दिवा लावणे
  • बुधवार, दि.27 डिसेंबर – भंडा-याचा कार्यक्रम

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT