धुळे

Dhule|साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Dhule Sakri Sarpanch reservation announced-साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर (धुळे) :साक्री तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे सन २०२५-२०३० या कालावधीसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. तहसील कार्यालयात दुपारी ३ वाजता तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत पार पडली. आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय गटांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होते.

यावेळी प्रांताधिकारी रोहन कुवर, अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर आणि नायब तहसीलदार किरण कोठावदे उपस्थित होते. सरपंचपदांचे आरक्षण अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशा चार प्रवर्गांमध्ये निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीकडे ग्रामस्थांसह विद्यमान व माजी ग्रामपंचायत सदस्य, संभाव्य उमेदवार,राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर अनेक गावांतील इच्छुकांच्या राजकीय हालचालींना आता प्रत्यक्ष सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी लोणखेडी, कळंभीर व क्समार या तीन ग्रामपंचायतच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित झाले. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी अष्टाणे, कोकले, आयणे (मळखेडे), मलांजन, निळगव्हाण, म्हसदी (प्र.नेर), नागपूर (ब), नाडसे, शेणपूर, अक्कलपाडा, बळसाणे आणि विटाई या १२ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या.

मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी कासारे, भडगाव (व), तामसवाडी, धाडणे, गणेशपूर, हट्टी (बु.), घाणेगाव, नांदवणको बैंकले, चिंचखेडे, फोफादे, निजामपूर,बाजदरे, अंबापूर, छडवेल (प.), ऐचाळे, बेहेड, दुसाणे, काळगाव आणि सैय्यदनगर इच्छापूर या १४ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित झाले.सर्वसाधारण प्रवर्गासाठी भामेर, झाले.

खोरी,प्रतापपूर,भाडणे/गोंदास, उभंड, उंभर्टी, नवडणे/सायणे, फोफरे, म्हसाळे, इंदवे, भागापूर, सातरपाडा, दाती/गंगापूर, दिघावे, कावठे, वर्धाणे, हट्टी (खु.), बेहेरगाव/रोजगाव, ककाणी/भडगाव, आखाडे, महिर, शेवाळी मा., उभरांडी/होडदाणे, छाईल, शेवाळी दा., कढरे, जैताणे, खुडाणे, मालपूर, धमणार, जामदे, उंभरे, छावडी/आमोदे, दारखेल आणि सतमाने या ३५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT