Dhule Accident | कावळे गावालगत ट्रकच्या धडकेत म्हसदीतील दाम्पत्य ठार : हॉटेल ताजजवळ भीषण अपघात

Dhule Accident | कावळे गावालगत ट्रकच्या धडकेत म्हसदीतील दाम्पत्य ठार : हॉटेल ताजजवळ भीषण अपघात
Published on
Updated on

पिंपळनेर : साक्री शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कावठे गावालगत हॉटेल ताजजवळ आयशर ट्रकने स्कूटीला दिलेल्या धडकेत म्हसदी येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी सुमारे ५ वाजता हा भीषण अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेने म्हसदीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आयशर ट्रकने (जीजे१६ एएम ४८६६) म्हसदी येथील कापड दुकान व्यावसायिक राजेंद्र महारु नेरकर (६६) आणि त्यांच्या पत्नी रेखा राजेंद्र नेरकर (५९) हे स्कूटीने दहिवेलकडून साक्रीच्या दिशेने येत होते. कावठे गावालगत हॉटेल ताज जवळ त्यांच्या स्कूटीला (जीजे १३ एएक्स ७४८४) धडक दिली. या धडकेत नेरकर दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.१०८ रुग्णवाहिकेसह खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी दाम्पत्याला तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत मदतकार्य केले. मात्र उपचारादरम्यान त्यां‍चा मृत्यू झाला.

वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश मोरे यांनी दोघांना मृत घोषित केले.दरम्यान,या अपघातात स्कूटीचे मोठे नुकसान झाले असून आयशरच्या पुढील दोन्ही चाकांचेही नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघातानंतर समोरून येणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेने म्हसदी गावात शोककळा पसरली आहे. नेरकर दाम्पत्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली असून, अपघातानंतर आयशर चालक फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news