पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील धंगाई गावात नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याची एक महिन्यापासून तीव्र टंचाई निर्माण झाली होती. महिलांना भल्या पहाटे तीन वाजेपासून गावाबाहेरील विहिरीवर पाणी भरायला जावे लागत होते. जलजीवन मिशनचे 'हर घर नल, हर घर जल'चा बोजवारा उडाला होता. नागरिकांना साचलेल्या डबक्यातील अतिशय दुषित पाणी प्यावे लागत होते तर ग्रामसेवक गावापर्यंत येत नसल्याची गावकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची नोंद घेत ग्रामसेवकाने पुढाकार घेत पाण्यासाठी याेग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वस्त केले आहे.
मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. दापूर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत होती. यात नियोजनाचा अभाव दिसून येत होता. मात्र प्रामसेवकांचे गावाकडे लक्षच नसत्त्याने केवळ दापूर ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत हजेरी देऊन ते निघून जातात अशी तक्रार स्थानिक महिला व नागरिकांनी केली होती.
धंगाई गावाची सुमारे तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असून जनावरांची पण संख्या ही मोठी आहे. येथे कोकणी व भिल्ल वस्ती असून सर्वच कुटुंब मजुरी करतात, मजुरीसाठी सकाळीच त्यांना घराचाहेर पडावे लागते मात्र या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. या गावात्त नव्याने पाणीपुरवठा बोजना मंजूर आहे.पाण्याची टाकी तयार आहे मात्र त्या टाकीत आजपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. टाकीत पाणी थांबते का नाही ? याची अद्याप ट्रायल ही घेतलेली नाही या गावात जुनी टाकी आहे मात्र त्या टाकीचे पाणी नियोजन अभावी निम्मे गावातच पाणी पोहोचत होते. मात्र ग्रामसेवक दोनच तास लाईट येते असे सांगतात तर येथील नागरीक सहा तास लाईट असते असे सांगतात. मात्र व्यवस्थित नियोजना अभावी उर्वरित गावात पाणी येत नव्हते पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी भरपूर आहे. पण नियोजन नसल्याने निम्मे गावाला पाणीपुरवठा होत नव्हता येथील महिलांना गावाबाहेरील अतिशय जुन्या विहिरीवर काट्यातून रस्ता काढत पहाटे तीन वाजेपासून पाण्यासाठी जावे लागत होते त्या विहिरीतही थोडेच पाणी असल्याने सर्वच महिला पाण्यासाठी एकाच वेळी झुंबड होत होती. या विहिरीनेही तळ गाठला आहे. मात्र पाणी तर लागणारच म्हणून दूषित पाणी चाळणीने गाळून एकेक बादली काढतात. एखाद्या वेळेस विहिरीत पडण्याची भीती होती तर अनेकांना सर्पदेश ही झालेला आहे तर ग्रामसेवक या गावात प्रत्यक्ष येऊन पाण्याचे नियोजन करीत नाहीत तर पाणी वितरण करणारा मुजोरी मुळे या नागरीकांना पाणी मिळत नव्हते. शासनाचे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट हरघर,नल हर घर जल योजना पूर्ण निकामी झाल्याचे दिसत होते. एप्रिल, मे,जून पर्यंत आम्हाला पाणी कसे मिळेल, जनावरांना पाणी कुठून पाजु त्यासाठी येथील नागरिकांनी पाणी टंचाईची माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाला जाग आली. ग्रामसेवकाने धाव घेतली व पाणी सोडणारे एकत्र येऊन पाण्याचे योग्य नियोजन करून सायंकाळी पाणी व्यवस्थित सुरू झाल्याने नागरिकांनी दै.'पुढारी' चे आभार मानले.