Child Marriage Pudhari
धुळे

वर-वधू दोन्ही अल्पवयीन असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ; बालविवाह प्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सध्या पीडित अल्पवयीन वधू बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षणगृहात आहे

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर : धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे झालेल्या बालविवाह प्रकरणी पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी मेघश्याम रोहिदास बोरसे यांनी फिर्याद दिली आहे.

सोनगीर येथे बालविवाह झाल्याची माहिती धुळ्यातील बालकल्याण समितीने ग्रामपंचायतीला पत्राद्वारे कळविली होती. त्यानुसार खात्री करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी बोरसे यांनी चौकशी केली असता, संजय लखा भिल (रा. सोनगीर) यांचा १८ वर्षीय मुलगा आणि नकाणे (ता.जि. धुळे) येथील एका १५ वर्षीय मुलीचा विवाह सोनगीरच्या अहिल्यानगर भागात झाल्याचे निष्पन्न झाले. उपलब्ध कागदपत्रांवरून वयाची खात्री झाली.

नियमानुसार विवाहासाठी वराचे वय २१ आणि वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र, येथे दोन्ही अल्पवयीन आहेत. मात्र, विवाहाची नोंदणी ग्रामपंचायतीतील रजिस्टरमध्ये केली नाही. अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह लावून दिल्याबद्दल आणि या विवाहास प्रोत्साहन दिल्याबद्दल मुला-मुलीकडील उपस्थित ११ नातेवाईक, मंडप, बँड, बग्गी व आचारी अशा ४ एकूण १५ व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पीडित अल्पवयीन वधू बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षणगृहात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT