Dhule news | शिरपूर येथे अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती बालविवाह

बाळंतपणानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Dhule news | शिरपूर येथे अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती बालविवाह
Published on
Updated on

सोनगीर : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कायद्याला धाब्यावर बसवून अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती बालविवाह लाऊन देण्याच्या धक्कादायक प्रकार बाळंतपणानंतर उघडकीस आला आहे. आई वडील व सासरच्यांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बालविवाहाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, शिरपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लाऊन देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित मुलीने नुकतेच बाळाला जन्म दिल्यानंतर ही बाब समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलगी अल्पवयीन असताना तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न जबरदस्तीने एका युवकासोबत लाऊन दिले होते, विवाह नंतर काही काळानी मुलगी गर्भवती राहिली होती. नुकताच तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्रकरण उघडकीस आल्यास त्वरित शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलीचे आईवडील, पती तसेच सासू सासरे यांच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून संबंधित सर्व आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे बालविवाह सारख्या गंभीर सामाजिक समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायद्याने बंदी असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच समाजातील जनजागृतीची गरजही निर्माण होत आहे.

पोलिस उपविभागीय अधिकारी विश्वजीत जाधव यांनी या घटने बदल माहिती देताना सांगितले की, १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बालविवाह झाल्याची बातमी शिरपूर शहर पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून घडलेला प्रकार खरा असल्याचे सिद्ध झाले. त्या अल्पवयीन मुलीचे १७ व्या वर्षी बाळंतपण झाल्याने तिने पुरुष अर्भकाला जन्म दिला. सदर प्रकरणी मुलीचे आईवडील, पती आणि सासू सासरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) फ सह बालकांचे लैंगिक अत्यारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम १०, ११ अन्वये शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री हेमंत खैरनार नार करीत आहेत.

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, पोलिस उपविभागीय अधिकारी विश्वजीत जाधव आणि शिरपूर शहर पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी तसेच उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी नागरिकांना आव्हान केले की, १८ वर्षाखालील मुलगी आणि २१ वर्षाखालील मुलगा यांचा विवाह बेकायदेशीर असून तो अपराध आहे. त्यासाठी कायद्यामध्ये गंभीर स्वरूपाचे कार्यवाहीची आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही बालविवाहाला प्रोत्साहन देऊ नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news