पिंपळनेर जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर पासून जवळच असलेल्या मानव केंद्राजवळील शिवमल्ल हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीभावाने हनुमान जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. भक्तांची कडक उन्हाळ्यात लाहीलाही होऊ नये म्हणून थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती.
विधीवत पूजाअर्चा करुन सकाळी ८ वाजता सत्यनारायनाची पूजा करण्यात आली. गावातील युवा उद्योजक तेजस कोठावदे, प्रजोत देसले, करण मराठे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर पिंपळनेर पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मल्याचा पाडा येथील गावकऱ्यांनी जयंतीसाठी सहकार्य केले. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी चौक, मराठा समाज उन्नती मंडळ पाटील गल्ली, विजू नाना युवा मंच, श्री साई शनी सेवा मंडळ, कलियुग मित्र मंडळ, गोपाळनगर, ऐखंडे गल्ली, सुभाष चौक, भाई गल्ली, संघर्ष ग्रुप, वाणी समाज यांनी देखील सहभाग नोंदवला.
भातोजी महाराज टेकपाडा भिलाटी व मराठा समाज मंडळाने भांड्याची मदत तसेच कडक उन्हाळ्यातध्ये भक्तांचे हेळसांड होऊ नये म्हणून मानव केंद्राच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भंडारा नियोजन समितीचे मयूर कासार, दिलीप माळी, प्रितम पाटील, लक्ष्मण बागड (लोटन दादा), शिवराज गांगुर्डे, रिखबशेठ जैन, विजय गांगुर्डे, योगेश नेरकर, निलेश वाणी, ज्ञानेश्वर ऐखंडे, नितीन नगरकर, दीपक धायबर, अरविंद पवार, अमोल पाटील, चेतन भोई, सुधीर चव्हाण, साहेबराव गांगुर्डे, पोलीस पाटील, विशाल आंबेकर, अक्षय मांडोळे, पंकज वानखेडे, निलेश कुंभार, श्रीराम पवार, बबलू गांगुर्डे, भूषण जगताप, दगडू शिंदे, चेतन पगारे, सौरभ बेनुस्कर, दिनेश कुंभार कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
हेही वाचा: