धुळे

पिंपळनेर : सामोडेच्या अनुदानित आश्रमशाळेत "शिक्षण सप्ताह" निमित्त विविध बौद्धिक उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षण सप्ताह च्या दुसऱ्या दिवशी अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील मराठी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमात "ग्रंथालयीन पुस्तकाचे वाचन व त्यावरील विद्यार्थ्यांचा अभिप्राय" तसेच "मराठी व्याकरण -धातूचे पोते भरणे एक खेळ" असे दोन उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी व प्राचार्य मनिष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी राबवली.

विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी ग्रंथालयातून घेतलेल्या पुस्तकाचे वाचन करून ग्रंथ वाचनाने विविध ग्रंथ लेखकाच्या परिचयासह पुस्तकातून काय मिळते, पुस्तके ही मानवाचे मित्र कसे आहेत येथपासून ते मी वाचन केलेल्या पुस्तकातून मला काय आवडले या विषयी अभिप्राय नोंदवले आहेत.

दुसरा उपक्रम मराठी व्याकरण - "धातूचे पोते भरणे एक खेळ" या उपक्रमात प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी धातू म्हणजे काय ? धातू साधित म्हणजे काय ? हे समजावून दिल्या नंतर विद्यार्थ्यांनी मराठीतील धातू शोधत कागदावर लिहून आपले नाव लिहून धातूच्या पोते रुपी बाॅक्समध्ये टाकली. अत्यंत आनंदात हा खेळ खेळण्यात आला. या उपक्रमास उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक जे.पी.सोनवणे, गणेश भावसार, प्रविण पगारे, विजय ठाकरे, पोर्णिमा भामरे, भिकन पारधी या प्राध्यापकांचे अनमोल सहकार्य लाभले.

SCROLL FOR NEXT