राज्यात आजपासून शिक्षण सप्ताह साजरा होणार

आठवडाभर विविध उपक्रम घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश
शिक्षण
शिक्षण
आष्पाक आत्तार

वारणावती : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आज दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये आजपासून शिक्षण सप्ताह साजरा होत आहे.

या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा यात समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या शिक्षण सप्ताह अंतर्गत प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार २२ जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, २३ जुलैला मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, २४ जुलैला क्रीडा दिवस, २५ जुलैला सांस्कृतिक दिवस, २६ जुलैला कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, २७ जुलैला मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम किंवा शालेय पोषण दिवस, २८ जुलैला समुदाय सहभाग दिवस असे विभाजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news