Dhule crime news 
धुळे

Mobile phone theft | वस्तीगृहातून मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

Dhule crime news | हा प्रकार उघडकीस आणण्यात दोंडाईचा पोलिसांना यश आले आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : दोंडाईचा येथील वस्तीगृहातील विद्यार्थिनींचे नऊ मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले मोबाईल जप्त करण्यात आले असून अवघ्या 48 तासात हा प्रकार उघडकीस आणण्यात दोंडाईचा पोलिसांना यश आले आहे.

दोंडाईचा शहरातील एका वस्तीगृहातील विदयार्थ्यांचे सॅमसंग, विवो, मोटोरोला, पोको, विवो अशा विविध कंपन्यांचे व मॉडेलचे सुमारे १,लाख ४२,हजार ५०० रुपयांचे ९ मोबाईल फोन चोरी झाले बाबत दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे स्वामी उमेश फटकाळ यांनी तक्रार दिली . त्यावरून अज्ञात आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदर तकार दोंडाईचा पोलीसांना प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी प्रभारी पोलीस अधिक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सदर घटनेची माहिती देवून दोंडाईचा पो. स्टे. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक इमरान खान, पोकॉ हिरालाल सुर्यवंशी, प्रविण निकुंभे, निलेश हालोरे, निलेश धनगर, प्रशांत बागल, राकेश रोकडे यांना चोरट्याला शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने तात्काळ तपास सुरू केला.

परिसरातील सिसिटिव्ही कॅमे-यांची सखोल पाहाणी करून मिळालेल्या गोपनिय माहिती वरून तपासाची चक्रे जलद गतीने फिरवुन सदर गुन्हा करणारा विधी संघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेतले. त्याने सदर गुन्हयाची कबुली देवून गुन्हयात चोरीस गेलेले सॅमसंग, विवो, मोटोरोला, पोको, विवो अशा विविध कंपन्यांचे व मॉडेलचे एकुण ९ मोबाईल फोन त्याचेकडून हस्तगत करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT