Jayakumar Rawal Ashok Kharat Fake Photo
धुळे : सोशल मीडिया द्वारा तथा पणन व राज शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार रावल व नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांचा सोबतचा मॉर्फ (बनावट) फोटो तयार करुन बदनामी करणा-याविरुध्द धुळे सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दिलेल्या तक्रारीत धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांचा व नाशिक येथील वादग्रस्त भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांचा सोबतचा मॉर्फ फोटो तयार करुन त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मिडीया वरुन प्रसारित केलेला आहे.
फिर्यादी हे सोशल मीडिया हाताळत असताना त्यांना व्हॉटस् अॅपवर पालकमंत्री जयकुमार रावल यांचा व नाशिक येथील आरोपी कॅप्टन अशोक खरात यांचा सोबतचा मॉर्फ फोटो प्राप्त झाला. त्याची त्यांनी व्यक्तीशः खात्री केली असता सदरचा फोटो हा खोटा (मॉर्फ) असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सायबर पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या कडील तांत्रिक उपकरणा द्वारे पडताळणी केली असता गुन्हयातील नमुद फोटो हा मॉर्फ (बनावट खोटा) असल्याचे कायदेशीर सिध्द झालेले आहे. दरम्यान, सोशल मीडिया द्वारे राजकीय, प्रतिष्ठीत व्यक्तीचे मॉर्फ केलेले फोटो प्रसारित करु नये, तसे केल्यास प्रचलित कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.