theft Pudhari
धुळे

Gold stolen during Mahakal visit| महाकाल दर्शन पडले महागात, घर फोडत ४६ तोळे सोने लंपास

जळगाव शहरातील प्रकार : सीसीटीव्हीत चोरटा कैद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मानगरात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून ४६ तोळे सोने आणि दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. घरमालक उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी गेले असताना मध्यरात्रीनंतर उशिरा १.३० ते २ च्या सुमारास ही चोरी करण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरमालक घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्याने बंद घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्याने मुद्देमालावर डल्ला मारला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटा कॅमेऱ्यात चित्रीत झाल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांनी तत्काळ ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले; मात्र श्वान घराच्या आसपासच घुटमळल्याने चोरट्याचा स्पष्टपणे सुगावा लागू शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT