धुळे : धुळे तालुक्यातील तरवाडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात सात बकर्या ठार झाल्या आहेत. या घटनेणने तरवाडे आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून रहिवाशी आणि शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती समजताच माजी आ.कुणाल पाटील यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना तत्काळ पंचनाम व शंभर टक्के भरपाई देण्याच्याही दिल्या आहेत. तसेच वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
तरवाडे येथील रसि शिवारात भाईदास नथ्थू चव्हाण यांच्या शेळ्यांचा वाडा आहे. या ठिकाणी बिबट्याने हल्ला करुन तब्बल सात शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे शेळीपालन करणार्या या शेतकर्याचे एकूण 1 लाखापेक्षाही अधिकचे नुकसान झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच धुळे ग्रामीणचे माजी आ.कुणाल पाटील यांनी तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या. त्यानुसार वनविभागाच्यावतीने वनक्षेत्रपाल भूषण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुभाष क्षिरसागर यांनी आज त्वरीत घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.
वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने संयुक्त पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्तास शंभर टक्के भरपाई देण्याचीही मागणी माजी आ.कुणाल पाटील यांनी केली आहे. दरम्यान बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून तत्काळ बंदोबस्त करण्याच्याही सूचना माजी आ. कुणाल पाटील यांनी वनविभागाला दिल्या आहेत. त्यानुसार वनविभाग युध्दपातळीवर कामाला लागले असून बिबट्याच्या पायाच्या ठशांच्या मागाचा शोधत घेत त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.