पिंपळनेर :(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहाणे ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला असलेली ही ग्रामपंचायत आज पुन्हा काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली.
सर्व नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार बापूसाहेब चौरे, साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच जितुबाई अशोक गावित, सदस्य सुमित्रा रतिलाल अहिरे, आभरम भारुडे, सुनीता कुवर, शालू बाई मालुसरे, गटप्रमुख महारु वारू मालुसरे, अशोक गावित, आत्माराम अहिरे, रतिलाल अहिरे व गावातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला.
हेही वाचा :