धुळे

धुळे : पेट्रोल पंपाची टाकी रिकामी करताना स्फोट, कर्मचारी गंभीर जखमी

Shambhuraj Pachindre

धुळे; पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपाची टाकी साफ करत असताना व्हक्युम क्लिनरमधून ठिणगी उडाल्याने स्फोट झाला. यात सफाई करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळे शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर संदीप चंपालाल भटेवरा यांचा एस बी एनर्जी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाच्या आवारात असलेली टाकीचे साफसफाईचे सुरू होते. त्यासाठी देवेंद्र लक्ष्मीकांत पवार या कर्मचाऱ्याला त्यांनी पंपाच्या टाकीत उतरवले. या टाकीमध्ये ज्वलनशील पदार्थ नसला तरीही या पदार्थाचा अंश टाकीच्या भिंतींना लागून होता. त्यामुळे टाकी कोरडी करण्याचे काम सुरू करण्यात आले.

यावेळी पवारने व्हक्युम क्लिनर यंत्राच्या मदतीने टाकी कोरडी करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, यावेळी मशीन मधून स्पार्किंग झाल्याने टाकीमध्ये असलेल्या ज्वलनग्रही पदार्थाचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. यात पवार हे सुमारे 95 टक्के गंभीरपणे भाजले.

तर टाकीजवळ उभे असलेले भटेवरा देखील भाजले. या अपघातानंतर देवेंद्र पवार यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे .पेट्रोल पंपाची टाकी साफ करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने भटेवरा यांनी कोणतीही साधनसामग्री वापरली नसल्याची बाब निदर्शनास आली. त्याचप्रमाणे ज्वलनशील पदार्थ भरून ठेवलेली टाकी साफसफाई करण्यासाठी तसेच कोरडी करण्यासाठी कर्मचाऱ्याला आत मध्ये उतरवून त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला. त्यामुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भटेवरा यांच्या विरोधात भादवि कलम 285 ,337 ,338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT