Dhule Pothole Bus Accident Pudhari
धुळे

Dhule ST Bus Accident | धुळ्यात निकृष्ट रस्त्यामुळे एसटी बस अडकली; मागील चाक खड्ड्यात रुतले

देवपूर परिसरात एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळ घटना

पुढारी वृत्तसेवा

Dhule Pothole Bus Accident

धुळे : धुळे शहरातील देवपूर परिसरात एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळ करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामाचा फटका आता राज्य परिवहन महामंडळाच्या बसला बसला आहे. शिंदखेडा येथून धुळ्याकडे येणाऱ्या एसटी बसचे मागील चाक अचानक रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यात अडकून बसल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.

या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पाईपलाईन आणि ड्रेनेजच्या कामामुळे रस्त्याचे काम सुरू होते. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू ठेवत दुसरी बाजू बंद करण्यात आली होती. कामाच्या संथ गतीमुळे आणि खराब दर्जामुळे स्थानिक नागरिक तसेच विविध पक्षांनी आंदोलन करत प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या.

त्यानंतर ठेकेदाराकडून तात्पुरत्या स्वरूपात काम पूर्ण करून रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. मात्र, या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नगावबारीकडून येणाऱ्या एसटी बसचे मागील चाक अचानक खचलेल्या रस्त्यात अडकल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही मोठी दुर्घटना टळली.

बसचे चाक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र सुरुवातीला त्यात यश आले नाही. अखेर डेपो प्रशासनाला माहिती देण्यात आल्यानंतर दुपारच्या सुमारास बस बाहेर काढण्यात आली. दरम्यान, बसमधील प्रवाशांनी खाजगी वाहनांच्या साहाय्याने शहरात प्रवेश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT