Dhule Oil Mill Fire | नंदाळे येथील जिनिंग आणि ऑईल मिलला भीषण आग; ७५ लाखांचे नुकसान

दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
Nandale ginning mill fire accident
Nandale ginning mill fire accidentPudhari
Published on
Updated on

Nandale ginning mill fire accident

धुळे : धुळे तालुक्यातील नंदाळे खुर्द येथील मंगलदीप कोटेक्स या जिनिंग आणि ऑईल मिलला लागलेल्या भीषण आगीत सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले असून, तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

मंगलदीप कोटेक्स येथे कापूस जिनिंग तसेच ऑईल मिलचे काम सुरू असताना अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कामगार आणि कर्मचार्‍यांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेचे अग्निशमन बंब तसेच पारोळा नगरपरिषदेचे एक अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.

Nandale ginning mill fire accident
Dhule news | सरकारची परराष्ट्र निती फेल झाल्याचा आरोप; शिवसेनेच्या ठाकरे गटाची निदर्शने

अग्निशमन दलाने सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. या आगीत कापूस, बारदानाचे बंडल, विविध कच्चा माल तसेच मिलमधील इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news