Dhule Shivshahi Bus Fire Pudhari
धुळे

Dhule Bus Fire | धुळ्यात शिवशाही बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित

नगावबारी परिसरातील उड्डाणपुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर बस वळत असताना चालकाच्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट

पुढारी वृत्तसेवा

Dhule Shivshahi Bus Fire

धुळे : धुळे शहरातील नगावबारी परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला बुधवारी (दि.२२) सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारहून धुळ्याकडे येणारी शिवशाही बस सकाळी सुमारे साडेदहा वाजता धुळ्यात दाखल झाली. नगावबारी परिसरातील उड्डाणपुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर बस वळत असताना चालकाच्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याचे निदर्शनास आले. धोका ओळखत चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्याचे आवाहन केले.

अवघ्या काही मिनिटांत सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडताच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. दरम्यान, या घटनेची नोंद देवपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT