धुळे

Dhule news | धुळ्यात शिवसेना पक्षाच्यावतीने फुटीर खासदारांचा प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध

शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ही आंदोलन करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिवसेना पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला आहे. शिवसैनिकांनी जीवाचे रान करून संसदेत पाठवलेले खासदार फुटीर झाल्याचा आरोप करीत निषेध करण्यात आला. यावेळी झालेल्या घोषणाबाजीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर देखील टीका करण्यात आली.

धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ही आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे , नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, हेमराज पाटील बाबाजी पाटील, कुणाल कानकाटे, डाॅ.अनिल पाटील एड.भूषण पाटील, सुनील पाटील अण्णा फुलपगारे, मुन्ना पठाण, प्रशांत भामरे, सुभाष मराठे, आबा भडांगे, पंकज भारस्कर, सुभाष मराठे, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, मयुरी सोनवणे, दिनेश पाटील, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षाचे सहा फुटी खासदार यांनी लोकशाहीची नीतिमूल्य पायी तुडवली असून त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा त्यांनी अपमान केला आहे. सत्तेच्या सारीपाटात कोट्यावधी रुपये घेऊन पक्षाशी बेईमानी करत गद्दारी केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या महानगरपालिका चौकात एकत्र येत प्रचंड घोषणाबाजी करत या खासदारांच्या कृतीचा जाहीर निषेध केला.

तसेच या फोडाफोडीला जबाबदार असणाऱ्या शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रमुखांवर देखील प्रचंड घोषणाबाजी करत निषेध केला. याप्रसंगी मोहन मोरे, मनोज वाल्हे, मनोज बंब, महादू गवळी, संदीप चौधरी, सुरज भावसार, बाळू शेंडगे, गजेंद्र पाटील, सुनील चौधरी,सागर निकम सागर साळवे, नितीन देशमुख, गौरव पाटील, नाना पाटील, गोकुळ बडगुजर, शुभम मतकर, पिनू सूर्यवंशी, मुकेश भोकरे, वैभव पाटील, इशतियाक आंसारी, संजय पाटील प्रवीण राणा, दीपक भोई, रवी मोरे, हर्षल वाणी, सचिन शिंदे, गुलाब धोबी, राजू पाटील, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT