Electric Shock Death  Pudhari File Photo
धुळे

Dhule Boy Death | विहिरीवरील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

रेवाडी शिवारातील घटना; गावात शोककळा, पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

पुढारी वृत्तसेवा

Electric Shock Death Boy Dhule

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी शिवारात विहिरीवरील विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

रेवाडी येथील आदित्य सतीश आखाडे (वय १२) हा आपल्या शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. यावेळी मोटार सुरू करत असताना त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. धक्का बसताच तो बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने धुळे तालुक्यातील लामकानी येथील रुग्णालयात दाखल केले.

तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे आखाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रेवाडी गावात शोकमय वातावरण आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT