Gutkha seized  (File Photo)
धुळे

Dhule crime | धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात प्रतिबंधित गुटखा साठ्यावर कारवाई

साक्री तालुक्यातील शिरसोळे येथील गुरुकृपा किराणा गोदामावर छापा टाकण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

धुळे : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे ॲक्शन मोडमध्ये आल्याने आता धुळ्याचे अन्य आणि औषध प्रशासन विभाग देखील सतर्क झाला आहे. या अंतर्गतच धुळे जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा 5.08 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागाचा पदभार हाती घेतल्याबरोबर राज्यात भेसळ करणारे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्यासाठी एरव्ही टाळाटाळ करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे. या अंतर्गत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिरसोळे येथील गुरुकृपा किराणा गोदामावर छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान विक्रीसाठी साठवून ठेवलेले महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखू, पाटीदार तंबाखू आदी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ₹.5, लाख 8,हजार 740 रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गोदाम मालक निलेश दत्तात्रय खैरनार यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाणे, येथे भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 30(2)(ए) 26(2)(आय) 26(2)(आयव्ही) 27(3) (डी) 27 (3)(ई) 3(1)(झेड झेड)(व्ही) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहणार आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. पवार, एस. बी. राणे तसेच गो. व्ही. महोरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT