दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.  Pudhari
धुळे

Dhule Crime | दहशत माजविण्यासाठी तलवार बाळगणारा युवक गजाआड

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Dhule Police Arrest

धुळे : धुळे तालुक्यातील बिलाडी-न्याहोळद रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ तलवार बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. राहुल भीमराव अहिरे (रा. न्याहोळद) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ एक युवक हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील आणि आशिषकुमार वानखेडे यांच्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.

पोलिस पथकाने पेट्रोल पंप परिसरात पोहोचून शोध घेतला असता, बाजूच्या मोकळ्या जागेत झाडाजवळ राहुल अहिरे हा तलवार बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तलवार जप्त केली.

दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अहिरे याच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT