Heatstroke Prevention Advisory Pudhari
धुळे

Dhule Nandurbar Heatwave | धुळे–नंदुरबारमध्ये उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे निर्देश

उद्योजक व व्यावसायिकांना कामाचे तास नियोजित करण्याचे कामगार अधिकारी मधुरा सुर्यवंशी यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Dhule Nandurbar Heatstroke Prevention Advisory

धुळे : श्रम व रोजगार मंत्रालय तसेच नाशिक विभाग कामगार उपआयुक्त यांच्या निर्देशानुसार धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन कामगार व उद्योग क्षेत्रासाठी विशेष खबरदारीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात असून, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी मधुरा सुर्यवंशी यांनी केले आहे.

कामगार व उद्योगक्षेत्रासाठी उद्योजक व व्यावसायिकांना कामाचे तास नियोजित करावे. विशेषतः दुपारच्या तीव्र उष्णतेत काम टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार कामाचा वेग कमी करण्यास परवानगी देणे, कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची, सावलीत विश्रांतीची व थंडावा मिळेल, अशी व्यवस्था करावी. आपत्कालीन बर्फ पॅक व उष्णता प्रतिबंधक साहित्य उपलब्ध करुन देणे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामागारांची नियमित आरोग्य तपासणी करणे.

कारखाने व खाणी व्यवस्थापनासाठीही स्वतंत्र सूचना देण्यात आल्या असून, सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत कामगारांना विश्रांती देणे, दोन जणांच्या गटात काम करण्याची पद्धत अवलंबणे आणि इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय उपलब्ध करून देणे. याशिवाय उष्णतेच्या दुष्परिणामांबाबत कामगारांमध्ये जनजागृती करावी.असेही स्पष्ट केले आहे.

धुळे–नंदुरबार जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यावसायिकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती मधुरा सूर्यवंशी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT