धुळे

धुळे : जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता, बाल अतिदक्षता विभाग युनिटचे उद्घाटन 

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा – धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात अति दक्षता विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे धुळेकर जनतेला शहरातच उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात अति दक्षता, बाल अतिदक्षता विभाग व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन राज्याचे  ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष  महाजन यांच्या हस्ते झाले.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, हिरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सयाजी भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दत्ता देगांवकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महेश भडांगे, माजी महापौर जयश्री अहिरराव, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील सांगळे उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालय हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने असंख्य रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी येत असतात. तसेच श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय हे चक्करबर्डी परिसरात असणाऱ्या नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्याने व सदर रुग्णालय शहरापासून 7 ते 8 किमी अंतरावर असल्याने गोरगरीब रुग्णांना  तेथे उपचारासाठी जाणे अडचणीचे होत आहे. त्याचप्रमाणे हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे स्थलांतरित झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय ऊस पडले होते.पण स्थानिक लोकप्रतीनिधीनी गोरगरिब रुग्णांना आरोग्य सेवा शहरातच मिळावी, या उद्देशाने शहरातच जिल्हा रुग्णालय कार्यान्वीत झाले आहे. या रूग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी  रुग्णालयीन प्रशासनामार्फत जास्तीत जास्त सेवा देणे व त्यापुढील अद्ययावत सुविधा देखील रुग्णांना मिळण्याकरिता पालकमंत्री महाजन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 3 मॉड्यूलर  ऑपरेशन थिएटर व 1  ॲडव्हान्स लेबर रुम तयार करणे कामी जिल्हा नियोजन समितीमधून  जिल्हा रुग्णालय, येथे ऑर्थोपेडीक व सेप्टीक मॉडयुलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यासाठी 3.25 कोटी, जिल्हा रुग्णालय, येथे जनरल व स्त्रीरोगशास्त्र विभाग मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर तयार करणे 4.30 कोटी, नेत्रविभाग मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर तयार करणे 2.30 कोटी, प्रसुती विभागाचे आधुनिकीकरण करणेसाठी 2 कोटी असा निधी देण्यात आला. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मुळे रुग्णांना दर्जेदार सेवा सुविधा पुरविली जाते, शस्त्रक्रियेदरम्यान जंतुसंसर्गाचा धोका अंत्यत  कमी होतो. प्रतीजैवीक औषधांचा खर्च कमी होतो. रुग्णांना मृत्यदर,विकृती कमी होतो.

जिल्हा रुग्णालय, येथे रुग्णालयीन सेवा बळकटीकरण करणे अंतर्गत ईसीआरपी मधुन 40 खाटांचे जनरल आयसीयु व 32 खाटांचे पीआयसीयु तयार करण्यात आलेले आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय, येथे 40 खाटांच्या आयसीयु उपकरणासाठी 3.26 कोटी, जिल्हा रुग्णालय, येथे 32 खाटांच्या पीआयसीयुसाठी उपकरणासाठी 2.48 कोटी तर जिल्हा रुग्णालय, येथे 40 व 32 खाटांच्या आयसीयु व पीआयसीयु मॉड्युलर करणेसाठी 3.73 कोटी निधी मंजूर केला आहे.

महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचे निवेदन

यावेळी महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या धुळे शाखेच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यात आली या शिष्टमंडळात महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती प्रतिभा घोडके , उपाध्यक्ष अमरजीत पवार,सचिव श्रीमती सुवर्णा सूर्यवंशी, कोषाध्यक्ष  कमलेश परदेशी, सहाय्यक अधिसेविका श्रीमती वंदना मोरे, सरला शिंदे आदींचा समावेश होता यावेळी संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महाजन यांच्यासमोर परिचारिकांच्या समस्यांचे निवेदन सादर केले या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे मागणी देखील यावेळी करण्यात आली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT