Arrested in bribery case
फागणे येथे ४ हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यासह चौघे 'ACB' च्या जाळ्यात  Pudhari File Photo
धुळे

Dhule Bribery case: ४ हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यासह चौघे 'ACB' च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : घराचे अतिक्रमण नियमित करून अद्ययावत उतारा देण्यासाठी ४ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह चौघां विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील, लिपीक किरण शाम पाटील, सरपंच पती नगराज हिलाल पाटील, रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही कारवाई आज (दि. १८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

पंचासमक्ष पडताळणी

पंचासमक्ष पडताळणी केली असता सरपंच पती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील यांना ४ हजारांची लाच देण्याकरीता प्रोत्साहन दिले. तसेच लिपीक किरण शाम पाटील याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

तक्रारदार फागणे येथील रहिवासी

या घटनेतील तक्रारदार हे धुळे तालुक्यातील फागणे येथील रहिवासी असून त्यांचे मौजे ग्रामपंचायत फागणे येथे मालमत्ता क. ६५१ (मिळकत क. २०२५) क्षेत्र ४५० चौ. फुटाचे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे. सदर घराच्या नमुना नं.८ उताऱ्यामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमण अशी नोंद असुन भोगवटादार म्हणून तक्रारदार यांचे नावाची नोंद आहे. त्यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT