Legal Aid Cell for Prisoners  Pudhari
धुळे

Dhule District Jail | धुळे जिल्हा कारागृहात न्यायबंदीच्या कुटुंबियांसाठी कायदेविषयक मदत कक्ष सुरू

जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. माधुरी आनंद यांच्या हस्ते उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

Legal Aid Cell for Prisoners

धुळे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, यांच्या निर्देशानुसार मुलाकत शिबिर उपक्रमांतर्गत न्यायबंदींच्या कुटुंबियांसाठी कायदेविषयक मदत कक्षाची स्थापना धुळे जिल्हा कारागृह (वर्ग 1) येथे करण्यात आली आहे.

या मदत कक्षाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. माधुरी आनंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. प्रविण कुलकर्णी, जिल्हा कारागृह वर्ग 1 अधीक्षक एकनाथ शिंदे, जिल्हा कारागृह वर्ग 1 विलास साबळे, संदीप एकशिंगे, किरण पवार तसेच लोकअभिरक्षक कार्यालयातील सहायक लोकअभिरक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

न्यायबंदींच्या कुटुंबियांना अनेकदा मूलभूत कायदेशीर माहिती व प्रक्रियात्मक मार्गदर्शनाचा अभाव भासतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांना न्यायप्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हा मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.

हे कायदेविषयक मदत कक्ष दररोज कार्यरत राहणार असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ ॲड. हितेंद्रसिंग तंवर, ॲड. पल्लवी गायकवाड, ॲड. नाना हालोर तसेच विधी स्वयंसेवक ईश्वर वाघ हे आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देणार आहेत.

न्यायबंदींच्या कुटुंबियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. माधुरी आनंद यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT