धुळे

Dhule Crime: पांझरा नदीकाठी गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शहरातील पांझरा नदीकाठावर गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. या कारवाईत युवकाकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

शहरातील संतोषी माता कॉलनीलगतच्या रस्त्यावर एक युवक गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी सपोनि दीपक ढोके यांच्यासह पोलीस अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर आणि आशिषकुमार वानखेडे यांच्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांच्या पथकाने पांझरा नदीजवळ सापळा रचून मंजूर शाह डबु शाह याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT