Dhule Crime | शिरपूर तालुक्यातील चिलारे शिवारातील गांजाचे शेत उद्ध्वस्त, सुमारे 85 लाखांचे गांजा पीक जप्त!

कापूस आणि तुरीच्या पिकामध्ये केली होती गांजाची लागवड
Dhule Crime | शिरपूर तालुक्यातील चिलारे शिवारातील गांजाचे शेत उध्वस्त, सुमारे 85 लाखांचे गांजा पीक जप्त!
Dhule Crime | शिरपूर तालुक्यातील चिलारे शिवारातील गांजाचे शेत उध्वस्त, सुमारे 85 लाखांचे गांजा पीक जप्त!
Published on
Updated on

धुळे : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या चिलारे शिवारात वन जमिनीमधील कापूस आणि तुरीच्या पिकामध्ये लागवड केलेल्या गांजाची पीक जप्त करण्यात आले आहे. पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईत सुमारे 85 लाख 50 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात शेतामधूनच एकास अटक करण्यात आली असून अन्य एक आरोपी पसार झाला आहे. या दोघांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम चिलारे परिसरात वनविभागाचे जमिनीवर शिलदार कालुसिंग पावरा व दिपक अभिमान पावरा (दोन्ही रा.चिलारे पो. सुळे ता. शिरपूर) यांनी कपाशी, तुरीच्या पिकामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ कॅनाबीस वनस्पतीची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर छापा कारवाईचे नियोजन केले.

Dhule Crime | शिरपूर तालुक्यातील चिलारे शिवारातील गांजाचे शेत उध्वस्त, सुमारे 85 लाखांचे गांजा पीक जप्त!
Dhule crime: गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या टोळीला बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

यासाठी पोउनि मिलींद पवार, पोउनि मनोज कचरे आणि पोलीस अंमलदार सागर ठाकुर, संतोष पाटील, संदिप ठाकरे, संजय चव्हाण, जगन्नाथ कोळी, मोहन पाटील, योगेश मोरे, विजय हिवरे, संजय भोई, सुनिल पवार, ग्यानसिंग पावरा, मुकेश पावरा, मुकेश पावरा, वाला पुरोहित, मनोज नेरकर, गिरधर पाटील, मनोज पाटील व इसरार फारुकी या पथकाच्या मदतीने संबंधित शेतावर छापा टाकला.घटनास्थळावरुन आरोपी दिपक अभिमान पावरा यास ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी शिलदार कालुसिंग पावरा हा पोलीसांची चाहुल लागल्याने शेतातून पळून गेला आहे. या कारवाईत 82 लाख 50 हजार रुपये किमतीचा 330 किलो गांजा जप्त करण्यात आला असून शिलदार कालुसिंग पावरा व दिपक अभिमान पावरा या दोघांच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8 (क), 20 (अ) ( आय ), 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news