पिंपळनेर,(जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे शाखेने मंगळवारी पिंपळनेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात कारवाई केली होती. लाचखोर पर्यवेक्षिका शुभांगी बनसोडेंना गुरुवारी न्यायालयात नेले जाणार होते. मात्र, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बनसोडे यांच्या पोटाचे यापूर्वी ऑपरेशन झालेले असून त्यात सेप्टिक झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर त्यांचे बाळही अकरा महिन्यांचे आहे. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आल्याने रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे शाखेचे उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमानशी बोलताना दिली. सुनंदा बनसोडे यांना प्रवासभत्ता बिल मंजूर करून देण्यासाठी दहा टक्के कमिशनपोटी 54 हजाराची लाच घेताना मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्या घरझडतीत काही रक्कम व दागदागिने मिळाले. मात्र,नियमित घरात असतात त्या वस्तू व पैसे असल्याने ते जमा केले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा –