Ambulance Pudhari
धुळे

Dhule Ambulance Rental Rates | शासकीय कामाकरिता रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम

सर्व रुग्णवाहिकांमध्ये भाडेदरपत्रक स्पष्टपणे प्रदर्शित करणे चालक व मालकांसाठी बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

Ambulance Charges Maharashtra

धुळे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, धुळे यांच्या कार्यक्षेत्रात शासकीय कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी दिली आहे.

निश्चित करण्यात आलेले भाडेदर पुढीलप्रमाणे

मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकुलीत) वाहनांसाठी 25 किमी अथवा 2 तासांकरिता 500 रुपये किंवा प्रति किलोमीटर 11 रुपये दर आकारला जाईल. टाटा सुमो व जीपसदृश (अवातानुकुलीत) वाहनांसाठी 600 रुपये किंवा प्रति किलोमीटर 12 रुपये दर लागू राहील. टाटा 407, स्वराज माझदा प्रकारातील वाहनांसाठी 800 रुपये किंवा प्रति किलोमीटर 13 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तर आयसीयू (कार्डिओ व्हॅन) वातानुकुलीत रुग्णवाहिकेसाठी 1000 रुपये किंवा प्रति किलोमीटर 20 रुपये दर लागू राहील.

हे भाडेदर केवळ शासकीय कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांना लागू असतील. सामान्य नागरिकांनी खाजगी कारणासाठी वापरणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी किमान प्रतिदिवस दर लागू राहणार नाही; त्यांना केवळ अंतरानुसार भाडेदर लागू राहील. मोफत सेवा देण्यास परवानगी असली तरी निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाही.

सर्व रुग्णवाहिकांमध्ये भाडेदरपत्रक स्पष्टपणे प्रदर्शित करणे चालक व मालकांसाठी बंधनकारक राहील. या भाड्यात चालकाचे मानधन व इंधन खर्च समाविष्ट आहे. दररोज प्रवास केलेले अंतर लॉगबुकमध्ये नोंदवून संबंधित विभागाकडून साक्षाकीत करून घ्यावी लागेल. वाहन स्वच्छ व यांत्रिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याची जबाबदारी चालक व मालकांवर राहील.

तसेच प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार लागू असलेले सर्व नियम व अटी यापुढेही लागू राहतील, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कदम यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT