धुळे

महामानवाला अभिवादन करण्यासाठी पिंपळनेरला जनसागर

गणेश सोनवणे

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शहरात भरगच्च कार्यक्रम पार पडले. सकाळपासूनच बसस्थानकानजीक डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून रीघ लागली होती. समाजबांधवांसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,शासकीय अधिकारी यांनीही महामानवाला अभिवादन केले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात चैतन्याचे वातावरण होते. शहरातील प्रमुख चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. जयंतीनिमित्त सकाळपासूनच बसस्थानकजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. यावेळी विविध राजकीय पक्ष,संघटनातर्फे बुध्दवंदना घेण्यात आली.

यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे,सपोनी सचिन कापडणीस, उपनिरीक्षक भुषण शेवाळे,पांडुरंग सूयॅवंशी, योगेश नेरकर, देविदास सोनवणे, विजय गांगुर्डे, संजय ठाकरे, अविनाश पाटील, संभाजी अहिरराव, योगेश बधाण, निलेश कोठावदे, आयुब पठाण, वाजीद पठाण, भटू पवार, महेश वाघ, अमित सूर्यवंशी, दादा अहिरे, नरेंद्र भामरे, गौतम पवार, पप्पु पवार, सागर पानपाटील, राज बर्डे, राहुल अहिरे, गणेश देवरे, किशोर वाघ, मुश्रफ शेख, बाबा शेख, उमेर पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

शहरात ठिकठिकाणी झाला जल्लोष
शहरातील समाज मंदिरापासून पोलिस स्टेशन,सामोडे चौफुली,बसस्थानक, सटाणारोड,गोपाल नगर,नाना चौक,खोल गल्ली,राम नगर परिसर,विविध ठिकाणी जल्लोषपूर्ण वातावरण होते.बाबा फ्रेंड सर्कल गृप तर्फे 200 शालेय विद्यार्थ्यांना बॅग व शालेय उपयोगी वस्तू वाटप व समाजसेवकांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागातून बसस्थानक परिसरातील डॉ.आंबेडकर पुतळ्यापर्यंत मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीत तरुण-तरुणींनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT