धुळे

धुळे जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडीत ॲड.राहुल पाटील विजयी

अविनाश सुतार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा वकील संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आपलं पॅनलचे ॲड. राहुल भटू पाटील हे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व औरंगाबाद जिल्हा वकील संघाचे लक्ष लागून होते. सन २०२४ ते २०२६ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीसाठी एकूण १३३८ वकील मतदारांपैकी ११४० मतदारांनी मतदान केले. यावेळी दोन पॅनलमध्ये मोठी चुरस दिसून आली. प्रचाराची रणधुमाळी हा चर्चेचा विषय होता. विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांमधील मतांचे अंतर अत्यंत कमी होते.

ॲड. राहुल भटू पाटील यांच्या आपलं पॅनलमधून अध्यक्ष म्हणून स्वतः ॲड. राहुल पाटील यांची निवड झाली. त्यांच्या पॅनलच्या महिला उपाध्यक्षा ॲड. भावना विश्वास पिसोळकर, सचिव ॲड. बळीराम वाघ तसेच आपलं पॅनलचे पाच कार्यकारिणी सदस्य निवडले आहेत.
धुळे वकील संघाची निवडणुकीत एकूण ३५ उमेदवार रिंगणात होते. यामधून सतरा उमेदवारांची निवड करायची होती.

अध्यक्षपदाच्या निवडीत ॲड.राहुल भटू पाटील यांना ५७४ उपाध्यक्षपदी ॲड. भिसे यांना ५७३, महिला उपाध्यक्षा ॲड. भावना विश्वास पिसोळकर यांना ५९१, सचिव ॲड. बळीराम दशरथ वाघ यांना ५९०, ॲड.उमेशकांत गुलाबराव् पाटील यांना ६०९, महिला सचिव ॲड. सुधा सुनील जैन ५६९, धुळे जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य ॲड.सारंग जोशी ७०९, ॲड. उमाकांत बाबूराव घोडराज ६६१, मते. ॲड. गजानन माळी ६६४, ॲड. दिनेश रमेश देवरे (पाटील) ६९४, ॲड.अर्जुन गिरीधर महाले ६९७. ॲड. ललित अशोक महाले ६९०, ॲड. प्रमोद संजय बडगुजर ६६८, ॲड. प्रथमेश प्रमोद दीक्षित ६६८, ॲड. विशाल भानुदास पाटील ६५८, महिला राखीव सदस्य ॲड. ज्योत्स्ना पारधी-दाभाडे ५४७, ॲड. शिवप्रिया सिताराम पाटील ४९० अशी मते विजयी उमेदवारांना मिळाली.

विजयी आपलं पॅनलचे प्रमुख ॲड. राहुल बी. पाटील यांचे प्रा. द.गा पाटील, जितेंद्र जैन बंब, योगेश पाटील, प्रशांत भदाणे, पप्पूदादा पाटील, नवल पाटील यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT