farmer loan waiver pudhari photo
धुळे

Dhule Farmer Loan Waive | कर्जमुक्ती योजनेत धुळ्यातील ३,२५८ शेतकऱ्यांना ३३.०१ कोटींचा दिलासा

आधार प्रमाणीकरण पूर्ण करा; पात्र शेतकऱ्यांना नव्या पीक कर्जाचा मार्गही मोकळा : पालकमंत्री जयकुमार रावल

पुढारी वृत्तसेवा

Farmer Debt Relief Dhule

धुळे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या तिसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील ३,२५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ३३ कोटी १ लाख रुपयांचा लाभ वर्ग करण्यात आला आहे. कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देऊन आगामी हंगामासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाने २ जून २०२६ रोजी या योजनेला मंजुरी दिली. राज्यातील ५३ बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. राज्यभरातील सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती नोंदविण्यात आली असून, पात्र थकबाकीदारांपैकी २०.१५ लाख शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर १७.२१ लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील १५ लाख ८५ हजार ४९३ कर्जखात्यांवर १३ हजार २७५.४५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात ३ लाख २७ हजार २५० कर्जखात्यांवर ३,१६०.४४ कोटी रुपये जमा करण्यात आले.

धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत तीन टप्प्यांत ५,३९४ कर्जखात्यांना ४८.१३ कोटी रुपयांचा लाभ मंजूर झाला आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.

पात्र यादीत नाव असूनही आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. प्रमाणीकरणानंतर पात्र लाभाची रक्कम थेट कर्जखात्यात जमा होणार असून, केवळ प्रमाणीकरण प्रलंबित असल्याने एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन रावल यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT