धुळे

धुळे शहरात सेक्युलर परिषदेत 16 राजकीय पक्ष, 30 सामाजिक संघटना एकत्र

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा-  शहरामध्ये आज सेक्युलर परिषदेचे आयोजन करण्यात आले. धुळ्यात जातीयवादी विचारांच्या विरोधात सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयोग झाला. सेक्युलर परिषदेमध्ये 16 धर्मनिरपेक्षक राजकीय पक्ष, 30 सामाजिक संघटना, विचारवंत, बुद्धिजीवी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहभाग घेतल्याची माहीती सेक्युलर परिषदेचे समन्वयक रणजीत भोसले यांनी दिली आहे.

सेक्युलर परिषदेची सुरुवात महापुरुषांना पुष्पहार घालून करण्यात आली. सेक्युलर परिषदेचा मुख्य उद्देश जातीवादी, कट्टरपंथी लोकांना रोखणे. शहरांमध्ये एकता, शांती निर्माण करणे. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून एकात्मता वाढविणे. सोशल मीडियावरील दुष्प्रचारला उत्तर देणे. हाच मुख्य उद्देश होता.

भविष्यात होणाऱ्या निवडणुका, राजकीय उलथा पालट यामुळे धर्मांध, जातीवादी लोक समाजातील वातावरण बिघडण्याचे काम करू शकतात. काही कट्टर पंथीय विविध जाती धर्मातील लोकांच्या मनामध्ये द्वेष, मत्सर निर्माण करू शकतात. शहरातील किंवा जिल्ह्यातील वातावरण कसे खराब होईल? याचाही प्रयत्न काही राजकीय मंडळी करू शकतात. सोशल मीडियाद्वारे समाजामध्ये तणाव निर्माण केला जाऊ शकतो. गंगा जमुना तहजीब संपण्याचे काम काही लोक करीत आहेत. धुळे शहर हे सर्व जाती धर्मांनी बनलेले आहे. धुळे शहरांमध्ये विविध जाती, धर्माचे, पंथाचे विचाराचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने राहतात. विविध जाती धर्मातील सण उत्सव एकमेकांसोबत साजरे करतात. एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हेच उद्दिष्ट ठेवून सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शहराचा विकास केला पाहिजे. माझ्या शहराची जमीन व माझ्या शहराची हवा हेच माझे जीवन आहे. मी जगणार येथेच आणि मरणार येथेच. हाच हेतू ठेवून आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहेत. या हेतूने धुळे शहरांमध्ये सेक्युलर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या परिषदेमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, संविधान बचाव समिती, जमियत ए हिंद, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, वंचित बहुजन आघाडी, मराठा सेवा संघ, बामसेफ, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, हरिजन सेवक संघ यांच्यासह 16 धर्मनिरपेक्षक राजकीय पक्ष, 30 सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

या परिषदेमध्ये मोहम्मद समी, ब्रह्मकुमारी रिटा दीदी,डॉक्टर अनिल पाटील,डॉक्टर सरफराज अन्सारी,रमेश श्रीखंडे, दरबारसिंग गिरासे, साबीर शेख, शाम सनेर, किरण जोंधळे, राज चव्हाण,योगेश जगताप,भैय्या पारेराव, एड. संतोष जाधव, राहुल वाघ, विशाल साळवे, जमील मंसूरी,एड. इम्रान शेख, अविनाश पाटील, हेमंत मदाणे, हरिचंद्र लोंढे,पोपटराव चौधरी, एडवोकेट एल आर राव,एडवोकेट जुबेर शेख, मधुकर शिरसाट, हेमंत भडक, सवाल अन्सारी, अतावू रहेमान, सत्तार शहा, इस्माईल पठाण,भानुदास बगदे, विनोद जगताप,डॉक्टर संजय पाटील, आप्पासाहेब तायडे,आनंद लोंढे, ,सुनील लोंढे ,बाबा हातेकर, योगेश इशी,हिरालाल सापे,आनंद सैंदाणे,मोहम्मद जैद, नितीन गायकवाड, अनिल दामोदर, नजनीन शेख, शंकर खरात, जाकीर शहा,गोपाल माने, गोपी लांडगे, अश्फाक शेख,श्रावण अण्णा खैरनार, मधुकर शिरसाट, आयुब खाटीक, रवी नगराळे, यांनी चर्चामध्ये भाग घेऊन आपले विचार मांडले. सेक्युलर परिषदेचे प्रास्ताविक रणजीत भोसले यांनी तर आभार प्रदर्शन सत्तार शाह यांनी केले.

या परिषदेमध्ये जातीयवादी कट्टरपंथी लोकांशी एकत्र लढण्याचे, सोशल मीडियामध्ये अफवांना उत्तर देण्याचे, शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या लोकांना एकत्र करून एकता व शांतीसाठी लढण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच एक समन्वय समिती स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT