उत्तर महाराष्ट्र

धुळे : अंजली निसर्गोपचार केंद्राचे चावडीपाड्याला उद्घाटन

अंजली राऊत

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात निसर्गाच्या सानिध्यात अंजली निसर्गोपचार केंद्राचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत व आमदार मंजुळा गावित, चैत्राम पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास माजी खासदार बापू चौरे, माजी सभापती गणपत चौरे, पोपटराव आहिरे, डॉ.योगीता चौरे, डॉ.रंजन गावीत, डॉ.जितेश चौरे, डॉ.मनिष सुर्यवंशी, जि.प.सदस्य धिरज आहिरे, विश्वास बागुल, अनिता चौरे, विलास बिरारीस, पं.स.सदस्य साहेबराव गांगुर्डे, शांताराम कुवर, रमेश गांगुर्डे, दानियल कुंवर,तानाजी बहिरम, वसंत घरटे, बालु चौधरी, अरूण माळके, प्रविण चौरे, सुनिल कोकणी आदि उपस्थित होते. उत्तम देशमुख यांनी त्यांची कन्या अंजली देशमुख यांच्या सहकार्याने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. पूर्वी नॅचरोथेरेपी सारख्या उपचार पध्दतींना मान्यता नव्हती. आदिवासी विकास मंत्री असतांना स्वतः वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे याबाबत माहिती आहे. त्यामुळे या उपचार पध्दतींना मान्यता मिळण्यासाठी सरकारकडे हा प्रश्न मांडला. त्यांनी याबाबत मंजुरी दिल्याने अंजलीने आदिवासी भागात आणि निसर्गाच्या सानिध्यात अंजली निसर्गोपचार केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते होत असल्याने मला त्याचे समाधान आहे. उपचार हे नेहमी प्रशिक्षित थेरेपिस्ट कडूनच करून घेण्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले. आमदार मंजुळा गावित, चैत्राम पवार, बापु चौरे यांनी ही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. पश्चिम पट्ट्यात व निसर्गाच्या सानिध्यात या उपचार पध्दतीची गरज असल्याने देशमुख यांनी पुणे येथून त्याबाबत शिक्षण पूर्ण करून परिसरातील रूग्णांसाठी अंजली निसर्गोपचार केंद्र गावातच सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिलीप पवार यांनी सुत्रसंचलन केले. अंजली देशमुख यांनी आभार मानले.

या आजारांवर मिळणार उपचार…

जली निसर्गोपचार केंद्र (प्राकृतीक चिकित्सालय) लखवा, वंध्यत्व निवारण, रक्त विकार, बि.पी, मणक्याचे आजार, डोळ्यांचे आजार, मूळव्याध, मासिक धर्म, मसाज सेंटर, ॲक्युप्रेशर, आय.एफ.टी, हँड पॅक, आय पॅक, संधी वात, पोटाचे विकार, उचकी, मधुमेह, सूज, वजन कमी करणे, नस चोकप, चर्मरोग, गुडघ्याचे आजार, किडणीचे आजार, वात, हाडाचे विकार,मुतखडा, स्त्रियांचे आजार आदी सुविधा स्टिम बॉथ, टेन्स, अल्ट्रा साऊंड, निपॅक, हँड बॅग, नस्य, आय.आर.आर, थरमल मसाज बेड, शिरोधारा आदि सुविधा उपलब्ध आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT