नाशिक (सातपूर) : सातपूर राजवाड्यातील एक बंद पडक्या घरामध्ये स्त्री जातीचे कुजलेल्या अवस्थेतील अर्भक सापडले. सदर अर्भक प्लास्टिक गोणीमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून सदर अर्भक अज्ञाताने तीन दिवसांपूर्वी ठेवले असावे असा अंदाज सातपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुलगी नको म्हणून वा, अनैतिक संबंधातून सदरचे अर्भक टाकून दिले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व माहिती तपासून संशयितांचा शोध घेत आहे.