उत्तर महाराष्ट्र

जळगाव : गुरे चारण्यासाठी गेलेल्याचा डोहात बुडून मृत्यू

अविनाश सुतार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गिरणा पंपिंग परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराखीचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, गुराखी केशव शंकर इंगळे (वय ५५, रा. सावखेडा ता. जि. जळगाव ) हा गुरे चारण्याचे काम करतो. ते रविवारी (दि.१३) सकाळी गुरे चारण्यासाठी घरातून बाहेर पडले. सायंकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ते कोठेही आढळून आले नाहीत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी उशीरा हरविल्याची नोंद करण्यात आली .

दरम्यान, सोमवारी (दि.१४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास केशव इंगळे यांचा मृतदेह गिरणा नदीपात्रातील फिल्टर प्लॅन्ट परिसरातील डोहात आढळून आला. नदीपात्रात मृतहेद आढळून आल्याची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोलीस कर्मचारी अनिल फेगडे, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत गावकर्‍यांच्या मदतीने मृतदेह डोहातून बाहेर काढला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं 'झुंड'विषयी ?

SCROLL FOR NEXT