नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; उंटवाडी येथील निरीक्षणगृह व बालगृहातून बालकाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बालगृहातील मुलगा दुपारी जेवण झाल्यानंतर अडीचच्या सुमारास ताट धुण्यासाठी गेला. परंतु, बराच वेळ झाल्यानंतरही तो परतला नाही. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याच्या शक्यतेवरून पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. मुंबई नाका पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.