उत्तर महाराष्ट्र

नाशिक : तवली फाट्यावरील फार्म हाऊसवर घरफोडी

गणेश सोनवणे

पंचवटी: पुढारी वृत्तसेवा : पेठरोडवरील तवली फाटा येथील फार्म हाऊसवर अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरट्याने दरवाज्याचे कडी कोयंडे तोडून ४० इंची एलईडी टीव्ही संच, गॅस सिलिंडर टाकी, वॉटर फिल्टर, दोन माइकसह साउंड सिस्टीम आदी वस्तू चोरून नेल्या आहेत.

याप्रकरणी भास्कर भिकाजी पिंगळे (५५, रा. गंगावाडी, मखमलाबाद रोड) यांनी म्हसरूळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार तवली फाटा येथील त्यांच्या फार्म हाऊसवर दि. ५ ते ६ दरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. यात चोरट्याने फार्म हाऊसच्या दोन्ही रूमच्या दरवाजांचे कडी कोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि आतमधील ४० इंची एलईडी टीव्ही संच, गॅस सिलिंडर टाकी, वॉटर फिल्टर, दोन माइकसह साउंड सिस्टीम आदी वस्तू चोरून नेल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. वाय. गवारे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT