उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भावाने केला बहिणीचा विश्वासघात; बँकेतील १० लाख रूपये परस्पर काढून फसवले

backup backup

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

येथील पिंपळनेरमध्ये पैशासाठी भावानेच आपल्या बहिणीचा विश्वासघात केल्याची घटना घडली. बहिणीच्या बँक खात्यातील १० लाखांची रोकड परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी लासलगाव येथील जयवंत मनोहर देसले यांच्यावर पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सौ. हेमलता उमेश गांगुर्डे (रा. गांधी चौक, पिंपळनेर ता.साक्री) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचे पिंपळनेर येथील युनियन बँक शाखेत खाते आहे. त्या खात्यावर त्यांनी दि. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी ७ लाख ५० हजार व १ लाख ५० हजार रूपये बारा महिन्यांच्या मुदतीवर ठेव ठेवली होती. याबाबत त्यांचा भाऊ जयवंत मनोहर देसले (रा. लासलगाव ता. निफाड, जि. नाशिक) यांना माहिती होती.

दरम्यान हेमलता यांनी, दरवर्षी मुदत ठेव रिन्युअल केली. या मुदत ठेवीबाबत त्या सन २०१८ साली बँकेत विचारपुस करण्यासाठी गेल्या असता, त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हेमलता यांचा भाऊ जयवंत याने एफडीची प्रत विश्वासाने प्राप्त करून, त्या रक्कमेचा बहिणीच्या नावे धनादेश मिळावा यासाठी बँकेत २८ सप्टेंबर २०१८ रोजी खोटा अर्ज केला. त्यावर बहिणीची खोटी स्वाक्षरी करुन धनादेश पुस्तक प्राप्त करून घेतले.

.त्यानंतर बहिणीच्या बँक खात्यास लिंक असलेला मोबाइल क्रमांक बदलून घेतला. त्यानंतर जयवंत याने ठेवीची व्याजासह असलेल्या १० लाख १९ हजार ९०० रुपयांच्या रक्कमेचा धनादेश स्वतःच्या नावे लिहून, त्यावर बहिणीची खोटी स्वाक्षरी केली. आणि तो धनादेश स्वतःच्या बँक खात्यावर वटवत बहिणीची फसवणूक केली.

एफडी च्या मुळ पावत्या भाऊ जयवंत याच्याकडे असल्याने हेमलता यांना आजपर्यंत कोणतीही तक्रार करता आली नाही. शेवटी नाईलाजाने त्यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि सचिन साळुंखे हे करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT