नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाशिक शहर भाजपतर्फे भाजप कार्यालय वसंतस्मृतीबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. 'एक नवाब, सौ जबाब' , 'ना डरेंगे, ना झुकेंगे' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
बॉम्बस्फोटातील ओरीपींशी आर्थिक व्यवहार करून मलिक यांनी राष्ट्रविरोधी काम केले असताना राष्ट्रवादी ईडीलाच बदनाम करत आहे. महाराष्ट्र सरकारने मलिक यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच सरकार आरोपीच्या पाठीशी आहे का? असा सवाल भाजपच्या प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला.
भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहील, अशी भूमिका पालवे यांनी स्पष्ट केली आहे. यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या निदर्शनाप्रसंगी आ. सीमा हिरे, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, अरुण शेंदुर्णीकर, अमित घुगे, बाळासाहेब पाटील, रामहरी संभेराव, सुनील देसाई, देवदत्त जोशी, अविनाश पाटील, भास्कर घोडेकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, सुरेश पाटील, हिमगौरी आडके, सुजाता करजगीकर, रोहिणी नायडू, श्याम पिंपरकर, सतीश रत्नपारखी, उदय जोशी, शशांक हिरे, अॅड. श्याम बडोदे, गणेश कांबळे, अमोल पाटील, अजिंक्य साने, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, राकेश पाटील, प्रवीण भाटे, चारुदत्त आहेर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मलिकांच्या अटकेविरोधात युवक राष्ट्रवादीची निदर्शने
अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी हे नवाब मलिक यांच्या घरी पहाटे पोहोचले. त्यानंतर त्यांनी घराची झडती घेत चौकशीला सुरुवात केली. अधिकार्यांच्या चौकशीला पूर्णपणे सहयोग देऊनसुद्धा केंद्र सरकारच्या सूडबुद्धीमुळे अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लाँड्रिंग या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. ईडीने 15 फेब—ुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते. त्यामधून अंडरवर्ल्ड असलेला संबंध, कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री, हवाला व्यवहार असे विविध आरोप मलिक यांच्यावर करण्यात आले असून, त्यांना देशद्रोही ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नवाब मालिकांचे जोरदार समर्थन करताना सांगितले.
यावेळी शादाब सय्यद, जय कोतवाल, बाळा निगळ, सागर बेदरकर, विशाल डोखे, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, संतोष भुजबळ, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, विक्रांत डहाळे, हर्षल चव्हाण, प्रशांत नवले, रियान शेख, सुनील घुगे, अक्षय पाटील, विशाल माळेकर, सोनू कागडा, गणेश खोडे, संतोष गोवर्धने, शहाद अरब, हाशीम शहा, रवी शिंदे, मुनावर शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.