Zilla Parishad Election Pudhari
अहिल्यानगर

Zilla Parishad Election: इच्छुकांच्या नजरा आता आरक्षण सोडतीकडे

शेवगाव तालुक्यात गट, गणांची रचना कायम

पुढारी वृत्तसेवा

बोधेगाव: तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गण पारुपमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत. गणांमध्ये किंचित बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या असून, राजकीय चाचपणी सुरू झाली आहे.

गत निवडणुकीच्या वेळी असलेले दहिगाव-ने, बोधेगाव, लाडजळगाव, भातकुडगाव हे चार गट नवीन पुनर्रचनेमध्ये कायम ठेवण्यात आले. पंचायत समितीचे दहिगाव-ने, घोटण, मुंगी, बोधेगाव, लाडजळगाव, खरडगाव, भातकुडगाव, अमरापूर हे आठही गण कायम ठेवले आहे. परंतु काही गणांत थोडा बदल केला आहे. एरंडगाव गण आता संपुष्टात येऊन नव्याने घोटण नावाने अस्तित्वात आला आहे. त्यामध्ये बोधेगाव गटातील कुरुडगावचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

अमरापूर गणात निंबे व भातकुडगाव गणात नांदूर ही दोन्ही एकाच ग्रामपंचायतींतील असलेली गावे आता भातकुडगाव गणात नव्याने समावेश करण्यात आला. ढोरजळगाव ग्रामपंचायतीअंतर्गत असलेले आपेगाव गतवेळी भातकुडगाव गणातून अमरापूर समाविष्ट करण्यात आले. नव्याने रचना करताना ग्रामंपचायत अंतर्गत येणारी सर्व गावे एकाच गण व गटात राहतील, याची प्रशासनाने दखल घेतली आहे.

गत निवडणुकीत अस्तित्वात असलेले चार गट व आठ गण कायम ठेवण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या चार पैकी तीन गटांवर, तर पंचायत समितीच्या सर्व आठ ही गणांवर घुले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने एकहाती वर्चस्व मिळविले होते. लाडजळगाव गटातून हर्षदा काकडे या एकमेव अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.

शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या अस्तित्वापासून भाजपच्या आमदार मोनिका राजळे, तर माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले, प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, जनशक्तीचे अ‍ॅड शिवाजीराव काकडे यांच्यामध्ये सत्ता संघर्ष झाला आहे. परंतु सद्यस्थितीत राज्यातील सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार व शरदचंद्र पवार असे दोन गट झाले आहेत. घुले बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार गटात, तर प्रतापराव ढाकणे हे शरदचंद्र पवार गटात दाखल झाले आहेत.

मतदारसंघात एकमेकांविरोधात मुख्य लढलेले राज्यस्तरावर एकत्र झाले आहेत. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील जागा वाटप व युती आघाडी कशा प्रकारे होणार, यावरच लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे

दहिगाव-ने गटात दहिगाव-ने व घोटण हे दोन येत असून, दहिगाव-ने गणात दहिगाव-ने, विजयपूर, रांजणी, सुलतानपूर बुद्रूक, मजलेशहर, शहरटाकळी, ढोरसडे, आंत्रे, भावीनिमगाव. घोटण गणात - घोटण, आंतरवाली खुर्द-ने, एरंडगाव, समसूद, एरंडगाव भागवत, लाखेफळ, बोडखे, ताजनापूर, दादेगाव, कुंटेफळ, दहिफळ जुने, कर्जत खुर्द, दहिफळ नवीन, ढोरहिंगणी, तळणी, खानापूर, कन्हेटाकळी, न. बाभूळगाव, कुरूडगाव व रावतळे.

बोधेगाव गटात बोधेगाव व मुंगी गण आहेत.

बोधेगाव गणात बोधेगावसह कांबी, बालमटाकळी, गायकवाड-जळगाव, सुकळी, हातगाव, मुंगी गणात - मुंगी, गदेवाडी, दहीगाव-शे, खडके, मडके, राक्षी, चापडगाव, प्रभूवडगाव, लखमापूर, खाम पिंप्री जुनी, खाम पिंप्री नवीन, पिंगेवाडी, सोनविहीर या गावांचा समावेश आहे.

भातकुडगाव गटात भातकुडगाव व अमरापूर गण आहेत. भातकुडगाव गणात भातकुडगाव, देवटाकळी, हिंगणगाव-ने, खामगाव, बक्तरपूर, जोहरापूर, भायगाव, लोळेगाव, सामनगाव, आखतवाडे, निंबे, नांदूर विहिरे, ढोरजळगाव-ने, वडुले बुद्रूक. अमरापूर गणात अमरापूर, वडुले खुर्द,

बर्‍हाणपूर, आव्हाणे बुद्रुक, शहापूर, आव्हाणे खुर्द, सुलतानपूर खुर्द, शहाजापूर, भगूर, वाघोली, वरूर बुद्रुक, वरूर खुर्द, ढोरजळगाव-शे, आपेगाव, मलकापूर, गरडवाडी, मळेगाव.

लाडजळगाव गटात लाडजळगाव व खरडगाव गण आहेत. लाडजळगाव गणात लाडजळगाव, बाडगव्हाण, मुरमी, आंतरवली खुर्द शे, शिंगोरी, दिवटे, आधोडी, शोभानगर, शेकटे बुद्रुक, चेंडेचांदगाव, राणेगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, कोनोशी, नागलवाडी, ठाकूर पिंपळगाव.- खरडगाव गणात खरडगाव, सालवडगाव, माळेगाव-ने, आखेगाव ति, आखेगोव डों, वडगाव, मुर्शदपूर, ठाकूर निमगाव, सोनेगाव, वरखेड, हसनापूर, कोळगाव, थाटे, मंगरूळ खुर्द, मंगरूळ बुद्रुक, अंतरवाली बुद्रुक व बेलगाव या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

आरक्षण सोडतीकडे लक्ष

जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षण सोडत कधी होणार, याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. निवडणुकीला अजून अवकाश असला तरी इच्छुकांनी आतापासूनच चाचपणी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT