श्रीरामपूर: पतीला पुण्याला कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात संगमनेर येथील पती, सासू, नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंतनू राजेंद्र गाडे (पती), छाया राजेंद्र गाडे (सासू), मयुरी परमानंद शिंदे (नणंद,रा.गणोरे,अकोले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राजेश्वरी गाडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. (Latest Ahilyanagar News)
राजेश्वरी शंतनू गाड़े हिचे घुलेवाडी संगमनेर येथील शंतनु राजेंद्र गाडे याच्याबरोबर विवाह झाला. पती शंतनू अनेक दिवस नोकरीनिमित्त अमेरिकेत होता. त्यावेळी सासू छाया गाडे व नणंद मयुरी परमानंद शिंदे यांनी राजेश्वरीचा छळ सुरू केला. राजेश्वरीचे सर्व सोन्याची दागिने काढून घेतले. नणंद मयुरीने हिने सर्व पगार आईकडे दे अशी मागणी केली.
पती शंतनू यास पुण्याला कायमस्वरूपी स्थायिक व्हायचे आहे म्हणून राजेश्वरींने माहेरून 20 लाख रुपये आणावे यासाठी तिला मारहाण करत शारीरीक व मानसिक छळ करु लागले. अमेरिकेहून आलेल्या पती शंतनूनेही पैसे आणावे म्हणून तिला माहेरी पाठविले. पैसे मिळत नाही म्हणून शंतनू याने राजेश्वरीचे आई, वडील व भावाला शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.