वार्डात आ. संग्राम जगताप यांची जादू चालेल असे दिसते Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar: वार्डाचं कसं, आमदार सांगतील तसं..!

गत पंचवार्षिक निवडणुकीला राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक विजयी झाले होते

पुढारी वृत्तसेवा

संदीप रोडे

नवीन प्रारूप प्रभाग रचना करताना जुन्या वार्डाचा भाग तोडून तीन वार्डांचा भाग नव्याने जोडून या वार्डाची निर्मिती झाली. वार्डाची रचना, व्याप्ती पाहता वार्डात आ. संग्राम जगताप यांची जादू चालेल असे दिसते. गत पंचवार्षिक निवडणुकीला राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक विजयी झाले होते. नव्याने रचना केलेल्या वार्डाची स्थिती पाहिल्यास नव्याने जोडलेला भाग हा राष्ट्रवादीला मानणारा असल्याने ‘आमदार सांगतील तसंच’, या वार्डाचे चित्र असेल, याची प्रचीती येते. (Latest Ahilyanagar News)

अविनाश हरिभाऊ घुले, रूपाली पारगे, नजीर अहमद शेख, परवीन आबीद कुरेशी हे_ राष्ट्रवादीचे चार नगरसेवक विजयी झाले होते. नव्या रचनेत या चौघांच्या वार्डातील झेंडीगेट, काळू बागवान गल्ली, खिस्त गल्ली, पिंजार गल्ली, सराफ बाजार, रामचंद्र खुंट, आडते बाजार हा सुमारे सात हजार लोकसंख्येचा भाग तोडण्यात आला, तर हरिजन वस्ती, शांतीनगर, केदार वस्ती, नवीन आणि जुना टिळक रोड, स्वाती़ कॉलनी, आनंदधाम परिसर, जुने बसस्थानक हा तितक्याच लोकसंख्येचा भाग नव्याने जोडण्यात आला. नव्याने जोडलेल्या भागात आ. संग्राम जगताप यांचे स्वत:चे वर्चस्व आहे. त्यामुळे वार्डातील भावी नगरसेवकांना आ. जगताप यांची मदत घेण्याशिवाय पर्याय नसेल. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनलेल्या या भागात आमदार जगताप सांगतील, त्याच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार अशी अटकळ असल्याने इच्छुकांनी आतापासूनच आमदारांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

गत पंचवार्षिकला झेंडीगेट पूर्ण असलेल्या वार्डाची नव्याने रचना करताना काही अंशीच झेंडीगेटचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या वार्डाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या परवीन कुरेशी व नजीर शेख यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र आहे. नव्या रचनेमुळे या दोन्ही माजी नगरसेवकांना आता नव्या वार्डाचा शोध घ्यावा लागणार असल्याचे दिसते. माजी महापौर सुरेखा कदम, बाळासाहेब बोराटे आणि माजी सभापती गणेश कवडे, सोनाली चितळे यांच्या जुन्या वार्डाचा भाग तोडून या वार्डाला जोडण्यात आला आहे. नव्या रचनेची व्याप्ती पाहता अविनाश घुले वगळता इतर तिघांना उमेदवारी देताना राष्ट्रवादीकडून नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक विपुल शेटिया यांना या वार्डातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले जाण्याची शक्यता वर्तविली जाते. घुले, शेटिया यांच्या जोडीला मात्र दोन चेहरे पूर्णपणे नवखे असणार, हे आता निश्चित मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT